किनगाव जटु ता.लोणार - येथील केन्द्रिंय जिल्हा परिषद प्रार्थमिक मुलांच्या शाळेतील समस्त विद्यार्थांना स्व.गोपीनाथराव मुंढे यांच्या जंयतीनिमित्त जय भगवान मंडळाच्यावतीने शाळेय नोटबुकचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पटसंख्याप्रमाणे एकुण 79 विद्यार्थांना या नोटबुकचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ नागरे, नवोदित अभिनेते अनिल सानप, संदिपभाऊ सातपुते ,भगवान बाबा मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभवदादा कायंदे, उपाध्यक्ष किरण करपे, स्वप्निल बिन्निवाले, भैय्या कापकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. स्व.गोपीनाथ मुंढे यांचे कार्य व प्रेम फक्त वंजारी समाजासाठी नव्हते तर त्यांचे सर्व जातीधर्मांतील लोकांवर प्रेम होते. शिक्षणाच्या बाबतीमधे इग्रजी मेडियमच्या शाळेलाही जिल्हा परिषद शाळा मागे पाडत आहे हे सिध्द केले आहे येथील जिल्हा परिषद शाळेंनी. आज किनगाव जटु येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा प्रगती पथकावर आहे. असे मत सचिन नागरे यांनी व्यक्त केले. मुलांनी कलेला वाव द्यावा असे नवोदित कलाकार अनिल सानप यांनी मनोगतातुन स्पष्ट केले. यावेळी शेखसर यांनीही आपले दोन शब्द व्यक्त करुन विद्यार्थांना स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागरे सर, मोबीन शेख सर , काकडे सर इ. शिक्षककर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश केदार,जितेश भडांगे,अरुण गिते,महादेव आंधळे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.
