आडोली ता. राधानगरी
महावितरण मध्ये अभियंता पदावर निवड झाल्याबद्दल कुमारी राजश्री बाळासो प्रभू हीच सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सचिव अतुल जोशी यांनी सांगितले कि अल्पावधीतच विद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केली आहे.वाकीघोल परिसरातील सर्व ग्रामस्थानी शाळेवर विश्वास ठेवलामुळे हि प्रगती झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष तांबळेश्वर हायस्कूलचे मुख्यध्यापक संतोष भोसले यांनी मनोगत व्यत्क्त केले ते म्हणाले कि श्री महालक्ष्मी हायस्कूल हे उपक्रमशील केंद्र बनले असल्याने पुढील काळात अनेक विध्यार्थी अधिकारी,उद्योजक म्हणून उदयास येतील.सत्कारमूर्ती राजश्री बाळासो प्रभूने मनोगतात सांगितले कि माझ्या यशात आई वडिलांबरोबर शिक्षकांचाही सिहांचा वाट आहे.शासकीय सेवेत असलेल्या माजी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार डी.के. पाटील सर यांना तर आदर्श विदयार्थी पुरस्कार ओंकार रंगराव तोरस्कर व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार पल्लवी प्रकाश ढोकरे यांनी पटकावला.
या कार्यक्रमाचे आभार के.टी.कुंभार यांनी मानले या कार्यक्रमाला बाळासो धोंड,बाळासो कामते,ज्ञानदेव पाटील,भारत पाटील,महादेव केसरकर,अमित गाताडे,राजेंद्र पाटील,गणेश देसाई,शिवाजी ढोकरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
