वुमेन्स अॅन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट संस्थेच्या कुसुम नरेश मिश्रा अध्यक्ष व श्रीमती मीराताई पाटील सचिव यांचे मार्गदर्शनाखाली लोणार तालुक्यातील बीबी येथे 40 दिवशी फॅशन डिझायनिंग व ब्युटी पार्लर तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. महिला दिनाचे औचित्य साधून गावातील गोरगरीब महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. रामदेव बाबा मंदिराच्या हाॅल मध्ये ब्युटी पार्लर साठी चाळीस महिला तसेच फॅशन डिझायनिंग मध्ये सुद्धा 40 महिलांनी भाग घेऊन प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण चाळीस दिवस चालणार आहे. त्यानंतर दोन्ही क्लासेसचा प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे छाया बगडिया यांनी सांगितले.
