बातमीपत्र

कोल्हापुर लोकसभा मतदार संघातील वंचित बहूजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.अरुणा माळी यांचा आज राधानगरी तालुका संपर्क दौरा पार पड्ला.सकाळी भोगावती येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन त्यानी सरवडे, मांगेवाडी, सोळाकुर, मोघर्डे, मल्लेवाडी, पनोरी, राधानगरी, फेजिवदे , तारळे तरसंबळे,राशिवडे खुर्द आदी गावातील आंबेडकरी अनुयायांची यांची भेट घेतली.यावेळी डॉ. माळी पक्षनिरिक्षक सुनिल घोटखिंडीकर,प्रा.जावेद वंचितचे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला,प्रा.शाहिद शेख यानी उपस्थितासमोर वंचित बहूजन आघाडीची भुमिका मांडली.या दौरयात भारिपचे राधानगरी तालुकाध्यक्ष संजय कांबळे सोळाकूरकर ,दलित चळवळीचे नेते यशवंत कांबळे सरवडेकर, डि. एस. कांबळे ( सर ) ,डॉ.मारुती कांबळे,राजू ढाले,राऊ कांबळे,लक्ष्मण कांबळे,जगदीश बेलेकर,दयानंद कांबळे,सुरेश जाधव,प्रविण कांबळे,बाबासो कांबळे राजू आणाजेकर व बळवंत कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा