मुंबई मधील धारावीत राहणाऱ्या ६5 वर्षीय यंकु नामदेव कळंबे व पत्नी सावित्री यंकु कळंबे हे धारावी येथील रेणुका हौसिंग सोसायटी धारावी क्रॉस रोड येथे राहत होते त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा व सून देखील राहत होते गेल्या सहा महिन्या पूर्वी सावित्री यंकु कळंबे यांना लाखावर मारल्याने त्यांची एक बाजू निकामी झाली व त्या अंथरुणावर पडल्या त्यांची सेवा करणे हे त्यांच्या सुनेला जमत नसल्याने तिने त्यांना शिवीगाळ,मारहाण असे प्रकार चालू केले व त्यांच्या घरातून त्यांना बाहेर काढले अशा परस्थितीत त्यांची मुलगी राहणार कुर्ला मुंबई हिने आईला व पित्याला आपल्या घरी नेऊन सांभाळ करत आहे सदर घटनेची तक्रार नोंदवण्याकरिता स्थानिक पोलीस ठाणे धारावी येथे गेले असता पोलिसांनी तक्रारींवर कारवाई न करता या वृद्ध दांपत्याला समाज देऊन घरी पाठवले परंतु आज देखील ते स्वतःच्या घरात न राहता मुलीकडे आहेत तरी यंकु नामदेव कळंबे यांनी त्यांच्या मुलावर पोलिसांनी कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.
