लोणार तालुक्यामधील सोमठाणा येथील ग्रामपंचायतीच्या नियोजना अभावी वार्ड क्रमांक तीन मधील ग्रामस्थ अजून सुद्धा तहानलेलेच असून तब्बल दोन ते तीन महिन्यापासून त्यांना पाणीच मिळाले नाही सोमठाणा येथील ग्रामपंचायतीने एक विहीर अधिग्रहण करून त्यावर सोमठाणा वासियांची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती पण या विहिरीचे पाणी हे वार्ड क्रमांक एक मध्ये सोडले जाते तर वार्ड क्रमांक 3 मध्ये अद्यापही पाणी मिळालेले नाही त्यामुळे वार्ड क्रमांक तीन मधील ग्रामस्थ हे संतप्त झालेले आहे तरी याकडे संबंधित अधिकारी विभागांनी लवकरात लवकर लक्ष देऊन वार्ड क्रमांक तीन मधील तहानलेल्या ग्रामस्थांची तहान भागवावी अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून मिळत आहे.
