जानेफळ तालुका मेहकर,बुलढाणा येथे महेश नवमी निमित्त भजनी मंडळी व महेश भगवानच्या जयघोषात माहिला व पुरुष मंडळीच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या पूर्वी घृष्णेश्वर मंदिर येथे जलाभिषेख करण्यात आला.महेशजी मुंदडा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात राजस्थानी समाज अध्यक्ष दिलीप गट्टानी,मनोज मंत्री,जगनाथ लाहोटी,निलेश नाहटा,जुगल राठी,अनिल जैन,पराग राठी यांनी योगदान दिले.
