महाराष्ट्रात अतिवृष्टी,अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे सर्वसाधारण शेतकरी कर्जबाजारी होतो व याच वैफल्यातून आत्महत्या सारखा पर्याय अवलंबिवतो त्यामुळे आपातग्रस्त शेतकऱ्यांचे संरक्षण कवच म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने सुरू केली या योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी प्रशिक्षण केंद्र बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले या कार्यक्रमाला उपविभागीय जिल्हा कृषी अधिकारी अमोल गाडेकर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उत्तम चव्हाण ग्राहक सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक जयेश कठोरे जिल्हा फिल्ड ऑफिसर दिलीप लहाने जिल्हा समन्वयक सीएससी रितेश झनके पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
