वरळी चा धोबीघाट मधील ओम ओमेगा शेलटर्स विकासक के.सी.सेठी ,धवल शहा व विपुल शहा यांनी रहिवाश्यांची फसवणूक करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना 51 करोड रुपये लाच देऊन रहिवाश्यांचे 3 वर्षाचे भाडे न देता इमारतीचे काम अपूर्ण ठेवले आहे त्या विरोधात विकासकांच्या सेल्स ऑफिस वर धडक मोर्चा दिनांक ४जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात आला या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक आमदार श्री.सुनीलजी शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री.सचिनभाऊ आहिर,मनसे विभाग अध्यक्ष श्री संतोष धुरी स्वाभिमान पक्ष मुंबई अध्यक्ष श्री राजेश हाटले,वंचित आघाडीचे पदाधिकारी,प्रहार जनशक्ती पक्ष व आर.टी. आय.ऍक्टिव्हिस्ट फोरम महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी उपस्थित होते.रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा व लवकरात लवकर घर द्यावे याकरिता हा मोर्चा काढण्यात आला.
