एम.एस.के. प्राथमिक विद्यालय सेमी इंग्रजी हिलरोड चुनाभट्टी सायन मुंबई येथील शाळेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये विध्यार्थी,शिक्षक व पालक यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या वेशभूषा करून सामाजिक संदेश देत या दिंडीला सुरुवात झाली या दिंडीद्वारे सामाजिक एकतेचा संदेश दिला जातो निसर्गाचा समतोल पाळा,झाडे लावा झाडे जगवा,पाणी वाचावा संतांनी दिलेल्या उपदेशाचे पालन करा अशा प्रकारचे अनेक संदेश या दिंडीद्वारे जनसामान्य जनतेपर्यत पोहचवण्याचे कार्य या शाळेच्या माध्यमातून केले जाते.ढोलताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषा करून ह्या दिंडीमध्ये पालक देखील सहभागी झाले हि दिंडी पाहून रात्रंदिवस आपली सेवा करणारे आपले मुंबई पोलिसांना देखील दिंडीत सामील होण्याचा मोह आवरता आला नाही.
