कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने सर्वत्र पूर परस्थिती निर्माण झाली बहुतेक गावांचा संपर्क खंडित झाला लहान मोट्या सर्वच नद्यांना पूर आल्याने बहुतेक ठिकाणाची वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत आहे राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंचागाने नधीनेही पाण्याची पातळी ओलांडल्याने काहीकाळ राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली.गारगोटी-कोल्हापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे कुर येथे पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला धरण पानलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने आज सायंकाळी ७.४० वाजता राधानगरी धरणाचे गेट क्रं ७ उघडला धरणातून एकूण ८५४० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे धरणाचे सातही दरवाजे खुले आहेत त्यामुळे पाटबंधारे विभागासह प्रशासनाकडून सतर्कतेचा दिलाय इशारा देण्यात आला आहे.
