वाकीघोल परिसराला भुदरगड तालुक्याला जोडणारा व कायम रहदारीचा असलेला रक्षादेवी ते एरंडपे रस्त्याचा काहीभाग वाहून गेला रस्त्याचा तुकडा पडल्याने हा रस्ता काहीकाळ बंद राहिल्यास वाकीघोलातील सर्व पत्रकाराची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे त्या रस्त्या सोबत विद्युत विभागाचे खांब देखील कोसळल्याने संपूर्ण वाकीघोल परिसरातील लाईट,फोन हे ठप्प झाले आहेत सतत पडत असलेल्या पावसाने नदीला आलेल्या पुरामुळे नदीशेजारील भात शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
