शेल्टर ऑफ पीस फाउंडेशन ही सामाजिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे.जवळ जवळ २५० ते ३०० गरजवंताना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे.तसेच कँसर,HIV,Knee Replacement,यासारखे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना मदतनिधी देऊन अथवा संपूर्ण ऑपरेशन विनामूल्य करून देण्यात येते.कित्येक अपंग व आजार ग्रस्त रुग्णांना व्हीलचेअर्सचे वाटप करण्यात आले.ग्रामीण भागातही शेतकरी वर्गाला मदत पुरविली जाते.शैक्षणिक क्षेत्रातही शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. सार्वजनिक उत्सवादरम्यान ज्ञानपेटी सारखा नवीन उपक्रम राबवून शैक्षणिक साहित्य व शालोपयोगी वस्तूंचे आदिवासी पाड्यात वाटप करून शिक्षणाचा प्रसार करण्यात मोलाचा वाटा उचलला.नुकत्याच एका शालेय कार्यक्रमात शेल्टर ऑफ पीस फाउंडेशनने बालविकास मंदिर ह्या मराठी शाळेच्या ३५ गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक जीवनाचा मार्ग सुकर करण्याचे कार्य केले.तसेच आदर्श नाईट हायस्कूल ह्या रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके व दफ्तर ( School Bags) देण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी शेल्टर ऑफ पीस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.संतोष दाभोळकर,सचिव श्री.राजेश हळदणकर,Live Maharashtra News Channel चे संपादक श्री.अनिल कांबळे,आदर्श नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.खराडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
