बातमीपत्र

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 36 वर्ष सेवा करणारे व गेली अनेक वर्ष शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ, निस्वार्थी व मितभाषी, असे व्यक्तिमत्व म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी रामचंद्र नारायण आंग्रे यांचा सेवानिवृत्ती समारंभ सोहळा भांडुप पश्चिमेच्या पराग विद्यालयाच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात रामचंद्र आंग्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर आमदार अशोक पाटील, शिवसेना विभागप्रमुख नगरसेवक रमेश कोरगावकर,माजी आमदार सुभाष बने ,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे, पराग विद्यालयाचे संचालक बाळकृष्ण बनेशेठ, उपविभाग प्रमुख दामोदर रावराणे, सुरेश शिंदे,पराग बने, शाखाप्रमुख राजेश कदम, भाजपाचे प्रवीण दहीतुले, मनसे उपविभागध्यक्ष नंदकुमार घोगळे, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष नितीन रेगे, स्थानीय लोकाधिकार समितीचे मनोज इलवे, विधानसभा संघटक नंदकुमार पाटकर, उपविभाग संघटक सुनंदा वाफारे, नेहा पाटकर ,विधानसभा संघटक अनुराधा मातोंडकर, प्रशासकीय कार्यालय प्रमुख अँड. वासुदेव मंणचेकर, महिला शाखा संघटक भाग्यश्री गवस, आर. के .डिएड कॉलेजचे संचालक रमेश खानविलकर, तसेच भांडूप विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, उपशाखाप्रमुख ,गटप्रमुख ,महिला आघाडी, युवासैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा