बातमीपत्र

Helping Hand Foundation च्या माध्यमातून राधानगरी फेजिवडे पैकी लोढेवाडी येथे पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन मदत करण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून मुंबई,नवी मुंबई व कोल्हापूर टीम च्या माध्यमातून या पूरग्रस्त बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात मदत जमाकरून या बांधवांच्या घरी ती मदत मिळावी यासाठी एक गाव निवडण्यात आले व त्या गावी हि मदत योग्य नियोजनाद्वारे पोहचवण्यात आली.यावेळी उपस्थित राधानगरी पोलीस ठाणे पी.आय.शेख साहेब,सचिन पारके व त्यांच्या सोबत पोलीस बांधव देखील उपस्थित होते तसेच Helping Hand Foundation या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अनिल राजाराम कांबळे,वाकीघोल ग्रामविकास समितीचे अध्यक्ष डॉमनिक डिसोझा,आडोली/दुबळेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच शिवाजी पाटील. राजु ढोकरे,दिपक केसरकर,राजाराम कांबळे,नवी मुंबई हेलपिंग हॅन्ड या संस्थेच्या अध्यक्षा वनिता त्रिंबके,सरचिटणीस उल्फत पठाण व विजय चव्हाण हे उपस्थित होते.तसेच कोल्हापूर जिल्हा हेलपिंग हॅन्ड संस्थेचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रुपेश आडोलीकर सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील दिपक कांबळे आमजाई, व्हरवडे,प्रविण कांबळे राशिवडे,डॉ.आर.बी.कांबळे तुरबे,अनिकेत कांबळे फेजिवडे.डॉ.सुमेध कांबळे मडीलगे ,संजय कांबळे,एम.डी.कांबळे Helping Hand Foundation ची पुर्ण टिम ने पूर्ण जबाबदारी घेऊन पूरग्रस्त बांधवाना मदत केली


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा