बातमीपत्र

सुनील दळवी यांना मा.राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार व गौरवचिन्ह..!!

अगदी लहान वयापासूनच ते कॉलेज जीवनात सुद्धा आपल्या कार्यात कुठेही राजकारण न आणता समाजकारण हाच आपला राजकीय वारसा सांगत सुनील दळवी त्यांनी समाजकार्यात पदार्पण केले.
कॉलेज जीवनातूनच त्यांनी व्हाईट आर्मीचे  पूर्ण वेळ सदस्य म्हणून काम केले आहे. यादरम्यान त्यांनी गोरगरिबांना मदत करणे, कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात गोरगरिबांना, दीनदलितांना मोफत  औषधोपचार देणे, याचबरोबर  बेवारस प्रेते जाळन्याचे कामसुद्धा सुनील दळवी यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठात एमए समाजशास्त्र शिकत असताना सुशिक्षित तरुणांना संघटित करून आपला समाज शिक्षणाच्या बाबतीत तेज तर्रर्र तरबेज बनून प्रशासनात अग्रस्थानी असला पाहिजे, या विचारांची वेगळी गुंफण सुनील यांनी केली. 
एकूणच मित्रत्वाच्या भावनेने, आपुलकीच्या नात्याने आणि माणुसकीच्या धर्माने सुनील दळवी परिपूर्ण आहेत. मध्यंतरी  सायबर चौकात झालेल्या अपघातात एका स्त्रीला  ताबडतोब दवाखान्यात नेऊन तिचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य याच सुनील दळवी यांनी केले आहे. मग अलीकडचे फुटलेले तिवरे धरण असो, कोल्हापूर सांगली येथील महापूर असो, अपंग आरती पाटील हिच्या खेळासाठी गावोगावी जाऊन गोळा केलेला निधी असो या सर्वच बाबतीत त्यांनी स्वतःला सुद्धा वेळ न देता मदतकार्य केले आहे.
शिवाय सुनील दळवी हे शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे अनुयायी आणि कट्टर पुरोगामी विचारवंत आहेत.

त्यांच्या याच प्रामाणिक, निस्वार्थी आणि अलौकिक कार्याची दखल घेऊन भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुनील दळवी यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा