लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार, आणि त्यांचे साहीत्य सर्वदूर पोहचावे यासाठी महाराष्ट्र शासनाने या वर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या विचार शिदोरीवरच आपला समाज यशोशिखरावर पोहचू शकतो असे प्रतिपादन भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक नाथाजी पाटील यांनी केले.
साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती भूदरगड यांचे वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते..
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फकीरा सेनेचे प्रदेशाध्यक्ष बळवंतराव माने हे होते..
यावेळी बोलताना श्री पाटील पुढे म्हणाले आण्णाभाऊंच्या घालुन दिलेल्या मार्गावरून कोल्हापूरचे पालकमंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटील हे दलीत समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असून दलितांच्या व्यथा, वेदना जाणून घेऊन त्यावर फुंकर घालण्याचे काम ते करत आहेत. आण्णाभाऊंचे विचार आचरणात आणून काम करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल..
यावेळी युवा नेते राहूल देसाई, मौनी विद्यापिठ सदस्य अलकेश कांदळकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तर छ. शिवराय, शाहु महाराज, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहीदास व आण्णाभाऊ साठे या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पी.एस. कांबळे सर, नामदेवराव कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष पांडुरंग वायदंडे यांनी केले. यावेळी प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील, भगवान शिंदे रणजित आडके,नामदेव चौगले, रमेश रायजादे, सूनिल तेली, सुनिल पाटील,शिवाजीराव मोरे,बाळासाहेब मोरे (म्हसवे),डी. एम.थडके सर,अशोकराव यादव,जयवंतराव वायदंडे,मारुती जाधव (वस्ताद),मोहन कांबळे (शेणगाव),काकासो आवळे,आर.एस.कांबळे (दोनवडे),गणपती मोरे(मेजर),दयानंद म्हेतर(सर),सुभाष कांबळे(सालपेवाडी),पांडुरंग यादव(खजिनदार),सुरेश कांबळे(सचिव)सालपेवाडी,राजू मोरे,उदय मोरे,श्रीपती मोरे(कुर),संजय नागरपोळे,साताप्पा नागरपोळे(शेणगाव),बबन कांबळे(वाघापूर),भुजंगा मोरे,सदाशिव मोरे(वाघापूर),अमित मोरे(दारवाड),रमेश साळवी(निळपण),समाधान मोरे(कोनवडे),सुरज देवकुळे,शिवाजी वायदंडे,बाबासो वायदंडे,विशाल वायदंडे,दिनकर चौगले(आरळगुंडी),गणपती नागर पोळे(पडखंबे),महादेव तिळवे(पाचवडे),
आभार सोमनाथ मोरे (उपाध्यक्ष)यांनी मानले
