आकुर्डे ता. भुदरगड सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादकांच्या दुधाच्या प्रत्येक थेंबांचा पै अन् पै वेळेवर चुकता केल्याने गेल्या २१ वर्षात उत्पादकांचा विश्वास त्रिमुर्ती दूध संस्थेने सार्थ ठरवला आहे त्यामुळेच या संस्थेचा दूध उत्पादनाचा दर्जा आजही टीकुन आहे असे प्रतिपादन बाजार समिती संचालक नाथाजी पाटील यांनी केले.त्रिमुर्ती सह. दूध व्याव.संस्थेच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी बोलताना श्री पाटील पुढे म्हणाले दरवर्षी दूध उत्पादनात चढता आलेख राहीलेल्या या दूध संस्थेने या वर्षी ७ .५० % इतका दूध दर रिबेट देण्याचा निर्णय घेतला असून उत्पादकांना इतर सोई सुविधा देण्यास ही संस्था नेहमीच कटीबद्ध आहे.यावेळी दिगंबर पाटील,सौ.संपदा हिरुगडे,सूर्यकांत पाटील,दिनकर कुंभार, धनाजी कांबळे,संदिप पोवार,धनाजी कुंभार,बंडेराव कुंभार,शशिकांत कुंभार या दुध उत्पादकांनी जास्तीत दूध पुरवठा केल्या बद्दल त्यांना बक्षीसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आले.
यावेळी बाजीराव पाटील, रंगराव शेणवी, बाळासो कुंभार, मोहन पोवार, संतोष कुंभार, बजरंग हुंदळकर, रविंद्र पाटील, कृष्णात पोवार, आनंदा पोवार, संजय कुंभार, शंकर जठार, युवराज लोहार, अनिकेत कुंभार ,आदींसह सभासद मोठया संख्येने उपस्थीत होते.स्वागत संचालक शामराव पाटील यांनी तर आभार सचिव रमेश भोसले यांनी मानले.
