बातमीपत्र

दिव्यांगांच्या प्रश्नासाठी असंवेदनशील शासनाला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी एकजुटीने लढा उभारूया -प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे

दिव्यांग मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आजरा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचा " संघर्ष मेळावा" आयोजित करण्यात आला होता. त्या आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे बोलत होते.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जुलमाला व अन्यायाला थारा नाही थारा नव्हता राजांच्या काळात कोणतीही तक्रार राजे त्याची दखल घेऊन अन्याय झालेल्या माणसाला न्याय देण्याचे काम राजांच्या हिंदवी स्वराज्यात केले जायचे.राजांच्या काळात अठरापगड जातीची माणसे गुण्या-गोविंदाने व समाधानाने जीवन जगत होती मात्र या लोकशाही राज्यात व माणसांना अन्यायाविरुद्ध दाद मागणे अवघड झाली आहे यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे यांनी केली.

     दिव्यांगांच्या आंदोलनाकडे प्रशासनाने डोळेझाक करू नये. त्यामुळे येणाऱ्या काळात या आंदोलनाचा वणवा आजरा तालुक्यातील सर्व गावांमध्ये कायदेशीररित्या घेऊन जाणार यासाठी जनमाणसात न्याय हक्काची जाणीव करून व गावात झालेल्या कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी ची मोहीम हाती घेणार आहोत असे दिव्यांग मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी उद्गार काढले.

       प्रशासन व्यवस्थेला व प्रशासन व्यवस्थेतील दप्तर दिरंगाई यामुळे लोकांना सतत शासकीय कार्यालय चालून झिजवावी लागतात याची प्रशासनातील अधिकाऱ्यांना याचे कोणतेच गांभीर्य राहिले नाही काही अपवाद वगळता या सुस्तावलेल्या प्रशासनातील व्यवहाराला कोठेतरी वाचा फोडावी लागेल असे मेळाव्याच्या ठिकाणी कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मत व्यक्त केले.

     आम्हाला न्याय हक्क मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू करावे लागणार आहे. प्रशासनातील चाललेला चालढकलपणा व नुसते कागदी घोडे नाचवणे बंद झाले पाहिजे. प्रत्येक अधिकारी यांनी आपली जबाबदारी ठोसपणे पूर्ण केली पाहिजे. असे मत समीर खेडेकर यांनी व्यक्त केले.

          या मेळाव्यात झालेले ठराव

१) आजरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांना ३ टक्के व ५  टक्के निधी अनुशेष पूर्ण खर्च केला पाहिजे. याची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यात "संघर्ष यात्रा " काढून जोरदार जनआंदोलन उभे करणार.
२) ग्रामपंचायतीच्या घरफळामध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी सर्व ग्रामपंचायतींमध्ये झाली पाहिजे. यासाठी सर्व ग्रामपंचायतींना निवेदन देणार.
३) प्रशासनातील चाललेल्या दप्तर दिरंगाईबाबत प्रशासना विरोधात जोरदार संघर्ष करण्यासाठी जनमानसात प्रबोधनाची मोहीम आखून जनतेतून संतापाचा उद्रेक बाहेर येण्यासाठी आजरा-चंदगड-भुदरगड-गडिंग्लज या भागात दप्तर दिरंगाई कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने मोहीम हाती घेणार.
४) आजरा नगरपंचायत आजरा व आजरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी व पंचायत समिती प्रशासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांच्या मागणीकडे डोळेझाक करू नये अन्यथा दिव्यांगांच्या प्रश्नासाठी दिव्यांग मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने जनआंदोलन करणार.

     या मेळाव्याचे प्रास्ताविक मुकुंद नार्वेकर यांनी केले व आभार प्रदर्शन सरिता कांबळे यांनी व्यक्त केले.
        यावेळी आबु माणगावकर, सोनाली रायकर, हसीना दरवाजकर,येळुबाई गोंधळी, गुरुनाथ पाटील, बाळू पाटील, निवृत्ती फगरे, संतोष सुतार, अब्दुल तगारे, दिलीप कांबळे,बशीर आगलावे, अहमद नेसरीकर, आनंदा गुरव व इतर सर्व कार्यकर्ते व दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा