पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन रॅली दि.१८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे सांगता व सभा दुपारी २:०० वा. दसरा चौक मैदानावर होणार आहे.
दि १८ सप्टेंबर रोजी ऍड. अण्णा राव पाटील,नवनाथ पडलकर,अशोक भाऊ सोनोने,रेखाताई ठाकूर व वंचित बहुजण आघाडी चे नेते ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.जागा वाटपामुळे एम.आय.एम.सोबतची युती तुटली मुस्लिम समाजातील उमेदवारांची निवड पक्ष श्रेष्टी करणार असल्याची माहिती डॉ.अरुणा माळी प्रदेश महासचिव वंचित बहुजन आघाडी यांनी दिली.या पत्रकार परिषदेस अनिल म्हनाने,डॉ. अरुणा माळी,ऍड. इंद्रजित कांबळे,डॉ.प्रेमकुमार माने,प्राध्यापक कपिल राजहंस, सतिष माळगे,दत्ता मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
