बातमीपत्र

राधानगरी तालुक्यातील वाकीघोल हा परिसर अतिशय दुर्गम व नेहमी दुर्लक्ष असणारा म्हणून ओळखला जात होता कच्चे रस्ते,लाईटची नीट व्यवस्था नाही,मोबाईल ला नेटवर्क नाही अशा परिस्थितीत येथील जनसामान्य जीवन जगत होते परंतु राधानगरी,भुदरगड,आजरा विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी या परिसराकडे स्वतः लक्ष घालून व नागरिकांनी निदर्शनास आणलेल्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यां सोडवण्याचा जणू छंदच त्यांनी स्वतःला लावून घेतला व आज विविध योजना या परिसर देऊन वाकीघोलातील नागरिकांचे जीवनमान प्रगतशील करण्याचे कार्य सुरु केले त्यातील एक भाग म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जळकेवाडी फाटा ते सावर्दे मुख्य रस्ता,सावर्दे ते कामटेवाडी रस्ता, आडोली फाटा ते दुबळेवाडी रस्ता,वडाचीवाडी ते मुख्य रस्त्यांचा विकास,सावर्दे गावातील स्टेज बांधून दिला,आडोली येथे हायमॅक्स दिवा बसवण्याचा उपक्रम,बागलवाडी नळ पाणी पुरवठा योजना,समाज मंदिर बांधण्याचे उपक्रम या सर्व कामाच्या माध्यमातून वाकीघोलातील नागरिकांच्या जीवनात एक प्रकारचा प्रकाश आणण्याचे काम आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने सुरु आहे.वाकीघोळातील उदघाटन मा.जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते पार पडले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा