मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे एका महिलेने तिच्या ४ मुली सोबत गावा शेजारी एका विहिरीत आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली उज्वला बबन ढोके वय ३५ मुलगी वैशाली ९ दुर्गा ६ आरोही ४ पल्लवी १वर्ष अशी नावे असून काल संध्याकाळी शेतातुन काम करून परत आल्यावर या महिलेने आपल्या चिमुकल्या मुलींना घेऊन घरून निघून गेली बऱ्याच वेळ झाला तरी मुली व तिची आई परत न आल्याने गावतील लोकांनी शोध घेतला व नातेवाईका कडे चौकशी केली पण काही माहिती मिळाली नाही.सकाळी काही लोकांना गावाशेजारी विहरीत २ मुली तरंगताना आढळल्या ही माहिती सर्वत्र पसरल्याने जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार डी.आर.मसराम व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले व जानेफळ येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सुरजूसे व कृष्णा हावरे सर यांनी सर्व प्रेत बाहेर काढले या प्रसंगी आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी भेट देऊन शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालयात मेहकर येथे पाठवण्यासाठी मदत केली व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी हजर होते पुढील तपास जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार डी.आर.मसराम साहेब व कर्मचारी करीत आहे.
