बातमीपत्र

लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथे दिनांक २६ ऑक्टोबर सकाळी १० वाजे दरम्याण येथील कचरू राघो पनाड वय ६१ यांचे निधन झाले मागील काही दिवसांपासुन सुरु असलेली पावसाची सतत धार आजही सुरूच होती तर मागासवर्गी स्मशानभुमीत अत्यं यात्रा घेवुन जाण्यायोग्य रस्ता नसल्याने व स्मशानभुमीची अपुरी जागा व सुविधां आभाव बघता अशा पावसाच्या वातावरणात अत्यंविधि करणे शक्यच नसल्याने व ग्रामपंचायत व संबंधीत प्रशासनाला मागासवर्गीय स्मशानभुमीच्या ह्या गंभीर समस्या बाबत वारंवार निवेदन ,मागण्या व उपोषन करुण ही समस्या मार्गी लावली नसल्याने नातेवाईकांनी व समाज बांधवांनी अंत्यविधी ग्रामपंचायत सचिवालया समोर करण्याचा निर्णय घेतला. मागासवर्गीय स्मशानभुमीच्या समस्यांबाबद दखल घेण्यास प्रशासन पुढे आले नसल्याने अखेर दुपारी ३ .३० वाजे दरम्याण नातेवाईक समाज बांधव व गावकऱ्यांच्या उपस्थीतीत सुलतानपुर ग्रामपंचायत समोर अंत्यविधी विधीवत पणे पार पाडण्यात आला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा