उचगाव नाक्याजवळ सरकारी जागेत झोपड्या बांधण्यात आल्या होत्या करवीर तहसीलदारांनी ह्या झोपड्यावर अतिक्रमणाची कारवाई करत झोपड्या उध्वस्त केल्या हि कारवाई दडपशाहीने केल्याचा आरोप करत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.झोपड्या पडल्याने अनेकांचा संसार उघड्यावर पडल्याने महिलांनी आंदोलन केले करवीर तहसीलदारांच्या दडपशाहीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या करीत याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बहु गलांडे यांना देण्यात आले.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी सकटे,सखाराम कामत,दीपक पाटील,सुनंदा गवळी,चांदणी बागडे,सीमा श्रृंगारे,अनिता चौगुले,सविता कांबळे हे सर्व उपस्थित होते.
