बातमीपत्र

गृहनिर्माण संस्था सभासद गोळा करण्याकरता MSWA ने चालवलेली फसवेगिरी उघड !

मुंबई जिल्हा सह हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी एका फोन कॉलने महाराष्ट्र सोसायटी वेलफेयर असोसिएशनची फसवेगिरी उघड केली. फोन कॉल्स मधून लोकांना सभासदत्व घेण्यासाठी खोटे सांगितलं जातं आहे की MSWA चे सभासदत्व घेणे कम्पलसरी आहे. जेव्हा कोणत्या ऍक्ट अंतर्गत कम्पलसरी आहे, असे विचारले तेव्हा ते घाबरून MSWA प्रतिनिधीने कोणतेही उत्तर न देता फोन कट केला. सदर संभाषणाची ऑडिओ क्लिप रेकॉर्ड असून सदर विषयाबाबत अधिक तपास करण्यासाठी सदर प्रकरणाची तक्रार मुंबई पोलीस आणि विभागीय निबंधकांकडे करण्यात असल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा