बातमीपत्र

कडगाव येथे दवाखाना थाटलेल्या बोगस डॉक्टरवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

कडगाव येथे दवाखाना थाटलेल्या बोगस डॉक्टरवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुन पोलीसांनी डॉक्टरास अटक केली आहे. आकाश नरोतम विश्‍वास (वय-39 रा. मुरगुड ) असे त्याचे नाव आहे.
पश्‍चिम बंगालमधील आकाश विश्‍वास यांनी गेल्या दहा वर्षापासुन कडगाव येथे दवाखाना थाटून मुळ व्याध व भगेंदर या रोगावर उपचार केले जात होते. आकाश याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना तो रूग्णावर उपचार करत असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचीन येत्नाळकर यांनी चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे आढळून आल्याने बेकायदेशी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याच्या कारणावरून भुदरगड पोलीसात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलीसांनी त्यास अटक केली आहे. त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कोष्टी यांच्यापुढे उभे केले असता त्याची जामीनावर मुक्कता केली.


आमच्यात सामील व्हा