विक्रोळी कन्नमवार नगर येथील पॅथॉलॉजि लॅब चालकाने लग्नाची बायको व तीन महिन्याची लहान मुलगी असताना देखील लग्नापूर्वीपासून सुरु असलेले अनैतिक संबंध जपत दुसऱ्या विवाहित महिलेशी लग्न केले व स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून मुंबईत चार ठिकाणी चालवले जाणारे लॅबचे उत्पन्न लुबाडणार्या महिलेच्या जाळ्यात अडकून स्वतःच्या आईला जीवे मारण्याचा प्रयन्त केला.लग्नाच्या बायकोला मारणे रोज सुरू होते असे असताना त्याच्या आईने स्थानिक मानवाधिकार संघटनेच्या सिन्ड्रेला गवळी व त्यांच्या सहकार्यांना मदतीची हाक देताच यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात धावघेत अनैतिक संबंध ठेवणारी महिला व लॅब चालक यांच्या गैरप्रकरना बद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सर्व माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.सिंड्रेला गवळी यांनी त्यांच्या सोबत संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष मिलिंद कदम,संदीप शिंदे संभाजी ब्रिगेड विक्रोळी तालुका अध्यक्ष,निशा वैगणकर समाजसेविका,राणी खेडेकर समाजसेविका,चंदू वैगणकर समाजसेवक उपस्थित होते.
