नाशिक - पर्यावरण रक्षणाचा संदेश देत लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केली आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं मुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला.त्यांच्या या कृतीतून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा आदर्श नागरिकांसमोर ठेवला आहे. त्याचप्रमाणे इंदिरानगर येथील पर्यावरणप्रेमी कैलास गांगुर्डे यांनीही घरच्या घरी शाडू मातीपासून सुबक गणेशमूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली आहे. घरगुती गणेश साकारण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
