मुंबई मधील नागरिकांना तासंतास रांगेत उभेराहून स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो काही ठिकाणी याचा गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधिविभागाने दखल घेऊन सर्व सामान्यांना त्रास होऊ नये याकरिता मुंबई कोर्ट मधील बार असोसिएशनला मुद्रांक विक्री परवान्यांचे नूतनीकरण करून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूरकरावी या करिता प्रधान मुद्रांक कार्यालय अप्पर मुद्रांक नियंत्रण मुंबई कोषागार अधिकारी व बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोआ राज्याचे अध्यक्ष मा. सुभाष घाडगे यांना निवेदन देऊन लवकरच या बाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केले असता बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोआ राज्याचे अध्यक्ष यांनी याबाबत लवकरच चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले
