बातमीपत्र

येत्या दोन महिन्यात वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक आहे.आतापर्यंत सगळे नेते अजमावलेत आता विरारला नेता नको सेवाभावी कार्यकर्ता हवाय जो लोकांच्या प्रश्नांसाठी काम करील,आमचा प्रहार पक्ष नेत्या अभिनेत्याचा नाही तर सच्चा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पालिका निवडणुकीत अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहा आणि हितेश जाधव यांचे हात मजबूत करा असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विरार येथे बोलताना केले.यावेळी प्रसिद्ध विधितज्ञ नोएल दाबरे, शिक्षणमहर्षी विकास वर्तक, सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ, शिवसेनेचे नेते प्रदीप शर्मा, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक राऊत , प्रहारचे नेते बल्लू जवनजाल व इतर व्यासपीठावर उपस्थित होते


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा