बातमीपत्र

हेल्प केअर फाऊंडेशन युवा संघटना वसई विरारच्या वतीने विश्व वदंनिय तथागत गौतम बुद्ध यांची जयंती पुरापाडा मैदान आगाशी,विरार येथे साजरी करण्यात आली.वदंनिय भन्ते ह्याच्या उपस्थिती मध्ये बुद्ध पूजा त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे मा. प्रा.जोगेंद्र कवाडे सर,मा.लोकनेते हितेंद्र ठाकूर,युवा नेते जयदीप कवाडे, चंद्रकांत भोईर,पांडुरंग इंगळे,दत्ता धुळे साहेब,विजय पवार,निनाद जाधव आदी मान्यवर उपस्थितीत होते.सूत्रसंचालन प्रा.प्रशांत बचुटे,स्वागत प्रमोद हिवराळे तर आभार विनोद पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संजय बहादुरे,रुपेश पाटील, धीरज पाटील, स्वप्नील नागऱ्या, सतीश बिहाडे, मुझफर,वोरा, धीरज बिहाडे,रवी बिहाडे,कैलास कंकाळ,सीमा कंकाळ, अंकिता पाईकराव यांनी विशेष जबाबदारी घेऊन कार्यक्रम यशस्वी केले यावेळी प्रभोधनावर आधारित कार्यक्रम प्रभोधनकार सप्त खंजीरी वादक तुषार सूर्यवंशी व सर्व जाती धर्माचे जनतेने एकत्र मिळून बुद्ध जयंती साजरी केली बहुसंख्यने युवा वर्ग आणि महिला यांनी सहभाग घेतला होता.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा