बातमीपत्र

होम काॅरंटाईनचा शिक्का मारलेल्या ठिकाणी जखम झाल्याने चाकरमानी चिंतेत

गुहागर: मुंबई वरुन गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या हातावर होम काॅरंटाईनचा शिक्का मारण्यात येतो, मात्र शिक्का मारलेल्या ठिकाणी खाज आणि सुज येऊन जखम झाल्याने वापरण्यात येणाऱ्या शाईमुळे अनेक मुंबईकरांना ॲलर्जी होत आहे. ही शाई त्वचेला किंवा शरीराला घातक तर ठरणार नाही ना? असे प्रश्न आता शिक्का मारलेल्या चाकरमान्यांना भेडसावत आहे. काल पाचेरी सडा गावातील हुंबराणी आणि विर वाडीतील चाकरमानी गावी येत असता गुहागरातील मार्गताम्हाने याठिकाणी होम काॅरंटाईनचा शिक्का त्यांना मारण्यात आला, विशेष म्हणजे शिक्का मारण्यासाठी असलेली शाई पातल स्वरुपात असल्याने मारलेला शिक्का आजुबाजुला पसरत गेला आणि त्यामुळे खुप विचित्र प्रकारचे चित्र किंवा टॅटू हातावर काढल्यासारखे दिसत आहे. त्याचप्रमाणे शिक्का मारलेल्या ठिकाणी सुज आणि जखम झाल्याने चाकरमानी चिंतेत पडले आहेत. आपल्याला यापासून काही त्रास होणार नाही ना? हि चिंता त्यांना लागुन राहिली आहे. शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाई पासुन त्वचेला किंवा शरीराला कोणत्याही प्रकारचा धोका नसेल तर तशा प्रकारची माहिती आरोग्य विभागाने देणे गरजेचे आहे किंवा काॅरंटाईन लोकांच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविका तसेच वैद्यकीय कर्मचारी येतात त्यांच्याकडून या शिक्क्या संदर्भात माहिती दिली गेली पाहिजे जेणेकरून चाकरमानी चिंतेत राहणार नाहीत. अन्यथा शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये आरोग्य विभागाने बदल करावा किंवा अन्य पर्यायी उपाय काढावा अशी मागणी मुंबईकऱ्यांकडुन केली जात आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा