जेष्ठ समाज प्रबोधनकार,महाराष्ट्र भूषण कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा जुना विडीओ प्रसिद्ध करुन कीर्तन परंपरेला बदनाम करण्याचे काम सुनीयोजीतपणे काही हिंदुधर्म द्वेशी लोक करत आहेत.आपल्या कीर्तनातुन समाजात अनेक चांगल्या विषयावर प्रबोधन महाराज करत असतात पण सम विषम तीथीवर संबंध आला तर मुलगा मुलगी होते अस महाराज कीर्तनात बोलले त्यांनी गर्भलींगनीदान यावर भाष्य केल असा अपप्रचार काही नास्तिक लोक करत आहेत.महाराजांवर राजकीय तथा शासकीय दबाव आणि संगनमताने खोटे गुन्हे दाखल करून वारकरी सांप्रदायाला वेठीस धरलेल आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रतील तमाम निष्ठावंत वारकरी संघटना कार्यकर्ते महाराज यांचे पाठीशी खंबीरपणे उभे आहोत जर शासनाने इंदोरीकर महाराज यांचेवर असणारे गुन्हे मागे नाही घेतले तर आम्ही रस्त्यावर उतरून टोकाच आंदोलन उभ करु आणि वारकरी साप्रंदायाला वेठीस धरणाऱ्या शासनाला व नास्तिकांना त्यांची जागा दाखवुन देऊ असे वक्तव्य वारकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी केले.वारकरी क्रांती सेना,जेष्ठ समाज प्रबोधनकार कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना जाहीर पाठीबा व समर्थन दिले व सर्व संघटनांनी सामील व्हावे असे आव्हान वारकरी क्रांती सेना,अध्यक्ष, ह भ प विजय महाराज सावरकर,महिला अध्यक्षा ह भ प रोहिनिताई महाराज राऊत,संगमनेर सचिव,ह भ प शरद महाराज पाटील,संघटक,ह भ प माऊली महाराज मुरेकर,ह भ प शारदाताई महाराज फोपसे,ह भ प मंगलताई पवार,ह भ प बाळकृष्ण महाराज पारखे जिल्हा अध्यक्ष,ह भ प पांडुरंग महाराज पठाडे जिल्हा उपअध्यक्ष,ह भ प हेमंत महाराज विश्वासराव,पप्पुराज काथे,ह भ प कचरू भाऊ पवार जिल्हा अध्यक्ष यांनी आव्हान केले.
