जगभरातील हिंदूंची अस्मिता असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमी मध्ये अर्ध्यात आयोध्या नगरीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभहस्ते मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. 500 वर्षानंतर जगभरातील हिंदूंना या निमित्ताने न्याय मिळाला आहे जगभरातील हिंदू बांधव याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करणार आहेत अशा शुभप्रसंगी तोरणा प्रादुर्भावामुळे मंदिरातील दर्शन सुविधा बंद करण्यात आलेली आहे, तरी माननीय राज्यपाल महोदयांनी कायद्याच्या चौकटीत राहून कायदा व सुव्यवस्था पाळून सामाजिक अंतर राखून, त्याचप्रमाणे मास्क, सानिट्झर, इत्यादी निर्बंधांचे तंतोतंत पालन करून हिंदू धर्मियांच्या भावनेचा आदर करत मंदिर खुले करण्यात यावीत याबरोबरच दिवसभर टीव्हीवर सुरू असणारे थेट प्रक्षेपण घरबसल्या सर्वांना बघता यावे याकरिता वीज पुरवठा दिवसभर खंडित होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी यासाठी आपण राज्य सरकारला आदेशित करावे अशी मागणी राज्याचे माजी मंत्री तथा परतूर चे विद्यमान आमदार बबनराव जी लोणीकर यांनी केली आहे.
