बातमीपत्र

तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना करण्याचे ठरवले तत्कालीन अर्थमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी वॉटर ग्रीड अभ्यासा करिता श्रीलंका, इस्राईल, कर्नाटक, गुजरात याठिकाणी तज्ञा सोबत दौरा करून इस्राईल सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड चा डिटेल प्रोजेक्ट तयार केला. मराठवाड्यातील जनतेला शेतीचे पाणी, उद्योगाचे पाणी, व पिण्याचे पाणी अत्यंत चांगल्या दर्जाचे शुद्ध पाणी वॉटर ग्रीड योजनेतून उपलब्ध होणार होते, या योजनेकरित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 25 हजार कोटी निधी उपलब्ध केला परंतु सरकार बदलले. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांचे स्वप्न होते कि मराठवाड्यातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे परंतु वारंवार सरकार दरबारी व विधानसभेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे योजनेबद्दल प्रश्न उपस्थित करून विद्यमान सरकार ला या मराठवाडा वॉटर ग्रीड बद्दल विचारणा केली, सरकार ने योजनेची तपासणी करू अश्या शाब्दिक कोट्या करीत ही योजना गुंडाळण्याचे महापाप करीत असल्याचा घणाघात लोणीकर यांनी केला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर या ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी होणार तेवढ्यात ठाकरे सरकार ने ही योजना बंद करणे म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय घेतला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा