परतूर मतदारसंघातील जनतेची तहान भागवण्यासाठी कार्यान्वित केलेली वॉटर ग्रीड योजना गेल्या आठ दिवसापासून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात बंद होती कोरोना संकटात ग्रामस्थांना व ग्रामपंचायतींना पाणीपट्टी भरणे कठीण झाले आहे मात्र आज आपण पुन्हा एकदा हि योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू करीत असून योजनेचे पाणी बंद कराल तर याद राखा असा दम अधिकाऱ्याना देत लोणीकर यांनी पाणीपुरवठा पून्हा सुरु केला.
