रविवार दिनांक ३० मे २०२१ रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी बी.डी.डी.चाळ पुनर्विकास प्रकल्प बाबतआढावा घेण्याकरित अखिल बी.डी.डी.चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समिती ना.म.जोशी मार्ग पुनर्विकास समिती तसेच नायगाव बी.डी.डी.चाळ समन्वय समिती च्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली सदर बैठकीत रखडलेला पुनर्विकास प्रकल्प गतिमान कसा होईल याबाबत चर्चा करण्यात आली.
महविकास आघाडी सरकारने या विषयी एकत्रित पणे बसून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न मार्गी लावावा असे मत यावेळी मांडण्यात आले.एकत्रित सर्व संघटना लवकरच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्षातील शिर्षस्त नेत्याशी संवाद साधणार असून याबाबत तोडगा काढावयास विनंती करणार असल्याचे सदर बैठकीत ठरवण्यात आले.या बैठकीस वरळी येथील श्री.किरण माने,हेमंत दळवी,भाई कांबळे,संदेश शीवनेकर,नायगांव येथील श्री.प्रशांत घाडीगांवकर,गजेंद्र धुमाळे,बाळा लोके,नितीन कदम,योगेश कांबळे,ना.म.जोशी चे कृष्णकांत नलगे, तानाजी केसरकर उपस्थित होते.
