कलावंत बन्धू आणि भगीणीनो गेल्या दीड वर्षा पासून सारा देश कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. कोरोनाची भयंकर लाट सर्वांनाच त्रासदायक ठरली असताना, कोरोना संसर्गवाढीस रोखण्यासाठी राज्य सरकारला लॅाकडाऊनची घोषणा करावी लागली होती त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. जनतेस खूप हाल अपेस्टा सहन कराव्यालागल्या. सरकारने सर्व सांस्कृतिक, धार्मिक उत्सवावर बंदी घातल्याने गावोगावी होणारे यात्रा जत्रा उत्सव.लग्न समारंभ,जागरण गोंधळ, नामकरण विधी,जन्मदिन सोहळे, किर्तन सप्ताह, सभा सम्मेलने तसेच सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यात आले नाहीत. पर्यायाने ह्या सर्व मंगल सोहळ्यात गायन-वादन करून आपली गुजराण करणारे तमाम\r\nलोककलावंत हाताला काम नसल्याने हवालदिल झाले. अनेक ज्येष्ठ कलावंत कोरोना काळात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने व गरिब परिस्थिती मुळे मृत्यूमुखी पडले.ह्या भयंकर संकटातून कलावंतांचे परिवार सावरावेत, त्यांना सरकार कडुन आर्थिक मदत मिळावी यासाठी *लोककलावंत सांस्कृतिक मंचचे* अध्यक्ष- *विष्णू शिंदे* यांचे दीड वर्षापासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. कोरोना महामारीच्या कठिण काळात त्यांनी आपल्या ट्रस्ट कडुन मुंबई,नवी मुंबई. ठाणे येथील हजारो कलावंतांना घरपोच रेशनिंग वाटप करुन त्यांना दिलासा दिला होता. कॅंसर ग्रस्त तसेच वयोवृध्द असंख्य कलावंतांच्या बॅंक खात्यात आर्थिक मदत जमा केली होती. कलावंतांना आर्थिक मदत मिळावी म्हणुन संबंधीत मंत्र्यांशीपत्रव्यवहार, गाठीभेटी यांचे सातत्य ठेवले होते.महाराष्ट्र सरकार मधील सांस्कृतिक खाते काँग्रेस पक्षाकडे असल्या मुळे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननिय अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत बैठकांचे आयोजन करून कलावंतांच्या दुःखांची-अडीअडचणीची त्यांना जाणीव करून दिली.ह्या प्रयत्ना नंतर कलावंता संदर्भात कार्यवाहीची चक्रे वेगाने फिरली आणि महाराष्ट्र राज्याचे कृतीशील मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे साहेब,\r\nराज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा.ना. अमित देशमुख साहेब यांनी कलावंतांसाठी २८ कोटीचे मदतीचे पॅकेज जाहीर करुन ५६ हजार कलावंतांना सरसकट ५ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.राज्य सरकारने घेतलेल्या ह्या दिलासादायक निर्णया बध्दल महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
मनोरंजन कट्टा
सुप्रसिद्ध गायक-गीतकार-संगीतकार *विष्णू शिंदे* यांच्या प्रयत्नाना यश कलावंतांसाठी २८ कोटीच्या कोरोना पॅकेजला मंजुरी
साप्ताहिक बातम्या
विलवडे स्थानकात थांबा...
Sep 12, 2026
