<span style="\"background-color:rgba(0," 0,="" 0.05);="" color:rgb(15,="" 15,="" 15);="" font-family:roboto,arial,sans-serif;="" font-size:14px\"="">कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे नागुडसरवस्ती या ठिकाणी संत सावता महाराज व विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराचे कळस रोहन करून मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.कुलस्वामिनी यमाई मंदिर परिसरापासून नागुडसर वस्ती पर्यंत टाळ मृदुंगाच्या तालावर ढोल लेझीम खेळत मूर्तींची वाजत-गाजत मिरवणूक काढून सर्व महिला भगिनींनी डोक्यावरती पाण्याने भरलेल्या तांब्या कलस घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.खरपुडे कुटुंबीयांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनी मध्ये सर्वांच्या सहकार्याने मंदिराचे काम करून त्या ठिकाणी श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती चे प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळी ह भ प एकनाथ महाराज चौधरी यांच्या हस्ते कळस रोहन करून बबनराव भागुजी दौंडकर,अथर्व जोशी काका त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.किसनराव महादेव खरपुडे,भगवान शेठ श्रीपती खरपुडे,गंगाराम शेठ लक्ष्मण खरपुडे,एकनाथ दगडू खरपुडे,आप्पा नथू खरपुडे,ज्ञानेश्वर लक्ष्मण खरपुडे,युवराज किसन खरपुडे,ह भ प दादाभाऊ भगवान ताम्हाणे,पांडुरंग रामचंद्र पाटील, व सर्व कनेरसरगावचे समस्त ग्रामस्थ तरुण कार्यकर्त्यांच्या संकल्पनेने बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थितीत अति उत्कृष्ट पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला.
