आदर्श गाव गोसासि तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी श्री संत शिरोमणी कान्होजी पाठक महाराज पालखी दिंडी पायी सोहळा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्सवात हर्ष सागर हॉटेलवर पालखीचे अनेक भक्तजनांनी दर्शन घेतले. त्यावेळी आदर्श गोसासी गावचे युवा उद्योजक मारुती शेठ गोरडे,संभाजी गोरडे विविध विकास सोसायटी चेअरमन,माऊली गोरडे व्हाईस चेअरमन,राजाराम गोरडे,किसनराव गोरडे माजी सरपंच,पोलीस हवालदार प्रभाकर गोरडे,नारायण पुरी,सुधाकर गोरडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव घाडगे,कनेरसर गावचे लोकनियुक्त सरपंच सौ.सुनिता ताई दत्तात्रय केदारी,उपसरपंच कल्पनाताई चांगदेव झोडगे,सुनील शेठ पारख,जवाहर शेठ दौंडकर, कनेरसर गोसासी गावचे इतर मान्यवर पालखी सोहळा निमित्ताने उपस्थित होते. ह भ प साकोरे महाराज,ह भ प आगरकर महाराज यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
