मंठा तालुक्यातील वडगाव सरहद्द येथे उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली उपसरपंच पदी रामकिसन बोडखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नवनिर्वाचित सरपंच अच्युत डोईफोडे यांच्या अध्यक्षते खाली तथा विस्तार अधिकारी एच.आर. ताठे ग्रामसेवक सतीश मुंडे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य गीता आंधळे, प्रियंका खंदारे, रंजना शिंदे, अंजना उघडे, आकाश डोईफोडे, विनोद उघडे, सात पैकी सात सदस्य यांनी पाठिंबा देऊन बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
