महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.B.R.Ambedkar) यांची १३२ वी जयंती त्याचबरोबर त्यागमुर्ती माता रमाई (Mata Ramai) यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५ वी) जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या लग्नाचा ११७ वा वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन वारली येथील जांबोरी मैदान येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला वरळीतील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध केल्याने नागरिकांना त्याचा आनंद घेता आला आयोजकांचे सर्व जनतेने आभार व्यक्त केले.
