महाविद्यालयात सेल्फ डिफेन्सचे धडे देत साजरा केला महिला दिन
मुंबई- महिला दिना निमीत्त मुंबईत अनेक कार्यक्रम राबवीले जातात. अनेक संस्थे तर्फे महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण सारखे उपक्रम घेतले जातात. पण मुंबईतल्या कुंग फू मार्शल आर्ट्स आणि स्पोर्टस फाउंडेशन तर्फे महिलांसाठी सेल्फ डिफेन्स कुंग फु आर्टस चा वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. हा वर्कशॉप खाररोड येथील संबोधी बुध्द विहार आणि वांद्रे येथील थाडोमल शहानी इनजीनियर महाविद्यालयातील मुलींना या वर्कशॉप मध्ये सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रोफेसर तसेच संस्थेचे प्रशिक्षक कुंग फू मास्टर देखील उपस्थित होते.
सध्या महिलांवर अन्याय, अत्याचार तसेच काही गुन्हेगारांकडून हल्ले होत आहेत. अशा वेळी स्वताच बचाव कसा करता येईल यासाठी महाविद्यालयातील मुलींना कुंग फू आर्टस आणि स्पोर्टस फाउंडेशन तर्फे सेल्फ डिफेन्चे धडे देण्यात आले. यावेळी संबोधी बुध्द विहार आणि इंजीनियर महाविद्यालयातील एकुण १०० ते १२० मुलींना सेल्फ डिफेन्स कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले.
