अकोला येथील गोरक्षक रोड स्थित स्थानिक खंडेलवाल ज्ञान मंदिर कॉन्व्हेंटमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेला सुरुवात झाली कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे आयोजित शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते या वर्षी सुद्धा या परीक्षेचे केंद्र असलेल्या खंडेलवाल ज्ञान मंदिर कॉन्व्हेंटमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी शहरातील विविध शाळांमधून एकूण २०१ विदयार्थी दिनांक २७.०९.२०१८ ते ३०.०९.२०१८ या कालावधीत हि परीक्षा देणार आहेत.शाळेच्या प्राचार्या सौ. मुग्धा कळमकर,विदर्भ कला शिक्षक संघाचे आशिष चौखे सर यांच्या निरीक्षणात हि परीक्षा शांततेत व सुरळीत सुरु आहे.
