महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सन २०१७-१८ मध्ये सुरु केला असून यामध्ये खारपान पट्ट्यात समाविष्ट एकुन गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये खामगांव तालुक्यासाठी पहील्या टप्प्यात १८ गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून आता उर्वरीत १२ गांवामध्ये हा आराखडा तयार करण्यात येणार आहे.यामध्ये प्रकल्प गावातील लहान शेतकरी यांना बदलत्या हवामानाला जुळवून घेण्यास सक्षम करणे व शेती व्यवसाय किफायतशीर करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.यामध्ये वैयक्तिक तसेच सामुहीक गटांव्दारे शेतकऱ्यांना विविध स्वरूपाचे लाभाची तरतुद आहे. या योजनेविषयी अर्ज प्रक्रिया, लाभार्थी निवड इत्यादी तसेच अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय खामगांव येथे संपर्क साधावा असे आवाहन सुनिल पवार तालुका कृषी अधिकारी खामगांव यांनी केले.
Follow Us On Social Media
Web Site: - www.livemaharashtra.com
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
Download Live Maharashtra App From Google Play store
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र. पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !! Pls. Visit Our NGO Website - www.helpinghandworld.org
