लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून लोकसभेच्या मतदानासाठी अगदी छोट्या मोठ्या खेड्यातून देखील मतदारांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळत आहे.. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे अगदी सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत या मतदारांमध्ये तरुण महिला वर्ग तसेच वयोवृद्धांनी देखील मतदान हा आपला हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.
