गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील सुमारे १५० महिला व पुरुषांनी मिळून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळावे म्हणून ग्रामपंचायत काम मागणी अर्ज दाखल केले. पण ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी वेळेवर मजुरांना काम मिळवून न दिल्यामुळे दि.२४ रोजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त श कार्यालयासमोर बेरोजगार भक्त्या मिळावा म्हणूनमादळमोही येथील १५० पेक्षा मजुरांनी आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी बीडचे रोहयो जिल्हाधिकारी यांना तत्काळ प्रश्न मार्गी लावा म्हणून आदेश आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
