कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी,आजरा,भुदरगड या तालुक्यातील मुंबईवासीयांचा कुटुंबिक मेळावा येणाऱ्या २५ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई येथे घेण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाची रूपरेषा व पूर्व तयारी कशी करावी व सध्या कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती या मध्ये उद्वस्त झालेले संसार यांना मदत कशी करता येईल या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्याकरिता या सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला अध्यक्ष म्हणून बंडू करवळ हे उपस्थित होते तर याठिकाणी संजय पाटील,विलास काशीद,अजित देसाई,नामदेव सोनार,कुंडलिक सुतार व live महाराष्ट्र न्युज वाहिनीचे संचालक संपादक अनिल कांबळे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
