मेहकर तालुका मधील अंजनी खुर्द येथे औरंगाबाद या महामार्गावर एका धाबा जवळ दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी चारच्या सुमारास यवतमाळ ते औरंगाबाद जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स लक्झरी बस एम एच 29 डब्ल्यू 111 व पुणे येथून नागपूर जाणारा मच्छी घेऊन जाणारा ट्रक यूपी 77 25 या दोन्ही भरधाव चालणाऱ्या वाहनांची समोरासमोर धडक झाली यामध्ये लक्झरी तील 27 प्रवासी होते त्यातील एक प्रवासी मुशिर आहमदखान वय 32 आमकिन्ही तालुका मानोरा जिल्हा वाशिम हा ठार झाला लक्झरी चालक अश्विन जाणे हा जखमी झाला तर ट्रकचा चालक जुनेद आलम हा गंभीर जखमी आहे हा अपघात रस्त्यावरील खड्डे चुकविण्यासाठी चालकांनी प्रयत्न केला परंतु दोन्ही वाहनाचा वेग रात्री जास्त असल्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने झाला असावा असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहेत.
