बातमीपत्र

सेंट्रल रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक अधिकारी श्री नागेश सकपाळ यांनी काल कल्याण स्टेशनवर  खास चेकिंग साठी जात असताना प्लॅटफॉर्म न.४आणि ५ च्या ब्रिज वर,एका कोपऱ्यात बसलेल्या गर्दुला आणि बुरखा घातलेल्या बाई जवळ एका छोट्या मुलीला पाहिले.त्या मुलीच्या पेहरावा वरून संशय येताच नागेश सकपाळ यांनी त्यांना हटकले असता आमची मुलगी आहे असे त्यांनी सांगितले,तितक्यात शेजारी उभ्या असलेल्या महिलेने त्यांची मुलगी नसल्याचे सांगताच त्यांनी त्या मुलीला त्यांच्या जवळून सोडविले,आर.पी. एफ.पोलीसांना बोलाऊन त्या दोघांनाही ताब्यात दिले.ही कारवाई सुरू असतानाच त्या ठिकाणी मुलीची आई  मुलीला शोधत आली असता त्या दोघींना ही पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चौकशी अंती मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.कर्तव्यात दक्ष पणा दाखवून त्या मुलीला वाचविल्या बद्दल मुख्य तिकीट निरीक्षक अधिकारी नागेश सकपाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


साप्ताहिक बातम्या